PM Kisan Update 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज मी घेऊन आली आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान सन्मान निधी योजना) 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर मग तुमची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता कधी जाहीर होणार यावर अजून काही जाहीर झालं नाही आहे. नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट देण्याची तयारी भारत सरकार करत आहे. जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात, पीएम किसान योजनेअंतर्गत, 13 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते. 1 जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे.
पीएम किसान योजना म्हणजे काय
PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत, मोदी सरकार दरवर्षी खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची वार्षिक मदत करते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
मित्रांनो तुम्हाला माहित असेल की, 2022 मध्ये 1 जानेवारीलाच पीएम मोदी योजनेच्या 10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. जर तुम्ही 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल पण तुम्ही अजून KYC केले नसेल, तर लगेच PM किसानच्या वेबसाइटवर जा आणि e-KYC करा. ई-केवायसी न केल्यास, 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.
जर केवायसी कशी करायची हे माहित नसेल तर तुम्ही पोस्ट पूर्ण वाचा. आम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती दिली आहे.
eKYC कसे केले जाऊ शकते
- ई-केवायसी करण्यासाठी, प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
- E-KYC पर्याय दिसेल.
- या E-KYC वर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि प्रमाणपत्र बटणावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.
- सर्व तपशील पूर्णपणे वैध असल्यास तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुमची प्रक्रिया बरोबर नसेल तर invalid असे लिहिले जाईल.
- तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे दुरुस्त करू शकता.
13 व्या हप्त्याचे पैसे कोणत्या तारखेला बँकेत येणार
पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखा समोर आल्या आहेत. 1 जानेवारी 2023 रोजी पीएम किसानची 13 वी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेंतर्गत 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. 17 ऑक्टोबर 2022 रोजी, पंतप्रधान मोदींनी 12 व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित केली.
अधिक वाचा : New Post Office Scheme: फक्त 417 रु. जमा करा आणि मॅच्युरिटीवर 1 कोटी मिळवा