PM Kisan 13th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होते ती वाट बघण्याची आता गरज नाही . आता तुम्हाला कुठे हि बाहेर जाऊन पैसे आणि वेळ वाया घालण्याची अजिबात गरज नाही आहे . तुम्ही आता घरीबसुन तुमच्या मोबाईलच्या मदतीने pm किसान योजनेच्या १३ वी यादी चेक करू शकता. मित्रांनो नुकतेच या वर्षी च्या अर्थसंकल्पात भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी PM किसान सन्मान निधी योजना जाहीर केली होती.
या योजनेचे मुख्य उद्देश हा शेतकरी बांधवांच उत्पन्न दुप्पट करणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६०००० रुपये इतकी रक्कम टप्प्याटप्याने देण्याची घोषणा सरकारने केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यात आले होते. शेतकरी मित्रांनी हि अर्ज सादर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले त्यांच्या याद्या जाहीर झाल्या असून त्या कश्या चेक करायच्या हे आम्ही तुम्हाला अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत . कृपया तुम्ही पोस्ट पूर्ण वाचा. PM Kisan 13th Installment
मोबाईलवरून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत आपले नाव कसे पहावे
मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या मोबाइल फोन च्या मदतीने यादी चेक करायची असेल तर त्याची पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे.
सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोरीवरून पीएम किसान लाभार्थी यादी नावाचे app डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप डाउनलोड केल्यामुळे तुम्हाला pm किसान योजनेविषयी अधिकची माहिती मिळून जाईल. तसेच तुम्ही त्या अँप च्या मदतीने तुम्ही तुमचे नाव यादीत आहे कि नाही ते तुम्ही पाहू शकता.
पीएम किसान पोर्टलवरून यादी कशी पहावी
- सर्वात आधी तुम्हाला pm किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
- होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला बेनेफिसिअर लिस्टचा पर्याय दिसेल.
- तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे कि नाही ते चेक करायचे आहे म्हणून तुम्हाला लाभार्थी यादी या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.
- या ऑपशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य म्हणजेच महाराष्ट्र, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव सिलेक्ट करायचे आहे.
- गाव या ऑपशनवर क्लिक करताच तुम्हाला get data या वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या गावातील जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी आहेत, त्यांचे नाव तुम्ही या यादीमध्ये सहज पाहू शकता .
अधिक वाचा : PM Kisan 13th installment date 2022:या दिवशी जमा होणार 13 वा हफ्ता, असे करा रजिस्टेशन