Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 अर्ज डाउनलोड

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि लिंगभेदाला आळा घालण्यासाठी ही योजना २०१६ पासून बाल विकास विभागाद्वारे  राज्य सरकारने सुरू केली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना फेब्रुवारी २०१४ मध्ये केंद्राने सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) केले जाते. त्यामुळे 50 हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 ही योजना मुलींसाठी आहे. या योजनेत मुलींना आर्थिक सहाय्य प्रदान कले जाणार आहे त्याचा तपशील खाली दिला आहेत. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

🚩 योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
🚩 सुरूवात२०१६
🚩 विभागबाल विकास
🚩 राज्यमहाराष्ट्र
🚩 लाभार्थीराज्यातील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुली
🚩 उद्देशमहाराष्ट्रातील मुलींचे जीवनमान उंचावणे
🚩 अर्ज कसा करावा ?ऑफलाईन

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 काय आहे?

 ज्या मातापित्यांनी  एक किंवा दोन मुलीच्या  जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली असणार आणि कुटुंबातील माता पिता गरीबी रेषेखालील जीवन जगत असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी बालिका कुटुंबाची वार्षिक 7.5 लाख रूपये (वार्षिक कुटुंब उत्पन्न रु. 7.5 लाख) होनी आवश्यक आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 योजनेचे उद्दिष्ट

  • आता कोणत्याही पालकांना आपली मुलगी म्हणजे ओझे वाटणार नाही आणि यामुळे मुलींचे जीवनमान सुधारेल.
  • लिंगभेदाला आळा घातला जाईल.
  • मातेच्‍या गर्भधारणेच्‍या वेळी लिंग निविडीस बंदी घालणे.
  • बालविवाहावर बंदी घालणे.
  • आर्थिकदृष्ट्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी.
  • या MKBY 2022 च्या माध्यमातून मुलींना शिक्षणाकडे प्रोत्साहन दिले जातील  आणि राज्यातील लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलण्यास प्रवृत्त केले जाईल.
  • .या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य उज्वल बनवण्याचा मानस आहे.
  • स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी.
  • मुलीच्या बदलल्या जीवनचरित्र सुरक्षाबद्दल खात्री देणे.
  • मुलींना शिकवण्याबाबत प्रोत्साहन देणे.
  • मुलीच्या  जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे.
  • मुलींना  स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना आरोग्‍य शिक्षण देणे  जेणेकरून त्‍या स्‍व:ताच्या पयावर उभे राहू शकतील.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 योजनेचे लाभार्थी

  1.  एका मुलीनंतर  कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेले पालक 
  2.  दोन मुलीनंतर  कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेले पालक 

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 योजनेचे फायदे काय आहेत?

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा फायदा  एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना दिला जातो.

  • या योजनेंतर्गत मुलगी आणि आईचे संयुक्त खाते बँकेत उघडले जाईल.
  • दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.
  • जर एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) केले जाते तर रु. 50,000 सरकार प्रदान करेल.
  • जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले तर 25-25 हजार रुपये सरकारकडून देण्यात येईल.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अंतर्गत, राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलीच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी देखील वापरता येईल.
  • या योजनेनुसार, एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत मुलींच्या आई किंवा वडिलांना नसबंदी करणे आवश्यक आहे.
  • केवळ 7.5 लाखांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच लाभ लागू
  • कुटुंब दर सहा वर्षांनी संचित व्याज काढू शकतात.

विविध टप्प्यात मिळणारे फायदे

विविध टप्पेमिळणारे फायदे
मुलीच्या जन्म वेळीयोजनेत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडले जाईल. त्यासाठी रु.१ लाख अपघात विमा व रु.५०००/- पर्यंत आणि ओव्हर ड्राफ्टचा फयदे देखील घेता येईल.

केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून Rs.२१२००/- नाममात्र रुपये १००/- प्रत्येक वर्ष इतका हप्ता जमा करुन मुलीच्या पालकांना विमा दिला जाईल ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास पुढील लाभ देण्यात येईल.
 १.अपघातामुळे मृत्यू झाल्यास ७५०००/- रुपये
 २.नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३००००/- रुपये
३. शिक्षा सहयोग योजनेंतर्गत मुलीला रुपये ६००/- शिष्यवृत्ती प्रती ६ महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावी पर्यंत शिकत असतांना दिली जाईल.
४. दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास रुपये ७५०००/- दिले जातील.
एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ३७५००/- प्रदान केले जातील.
 दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५०००/- रुपये दिले जातील.
मुलगी ५ वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी पहिल्या मुलीसाठी प्रतिवर्षी २००/- रुपये.
दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रतिवर्षी १०००/- रुपये.
प्राथमिक शाळेत शिकत असतांना (इयत्ता १ली ते ५वी)पहिल्या मुलीसाठी प्रतिवर्षी २५००/- रुपये.
दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी १५००/- रुपये.
 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्यावेळी(इयत्ता ६वी ते १२वी)पहिल्या मुलीसाठी प्रत्येक वर्षाला ३०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता.
दुसऱ्या मुलींसाठी दोन्ही मुलींना प्रत्येक वर्षाला २०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता.
वयाच्या १८ वर्षावेळी विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपये दिला जाईल.त्यापैकी किमान १००००/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्चाची तरतूद.
मुलीचा जन्म झाल्यांनतरपहिल्या मुलीला सोन्याचे नाणे दिले जाईल. (५०००/- रुपये कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र)
दुसऱ्या मुलींसाठी लाभ नाही
गावाचा सत्कार ग्रामपंचायतीला ५ लाख रुपयांचे बक्षीस मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते दिले जाईल.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 योजनेची पात्रता आणि अटी

या माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी पुढील   पात्रता अटी आहेत.

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा  रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. जर कुटुंबात  एक किंवा दोन मुली असतील तर तुम्ही योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
  3. एका कुटुंबात तीन मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, तरच तुम्ही योजनेत अर्ज करू शकाल.
  5. पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत मुलींच्या आई किंवा वडिलांना नसबंदी करणे आवश्यक आहे.
  6. मुलीची जन्म नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 योजनेसाठी महत्वाचे कागदपत्रे

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी,तुम्हाला खाली दिलेल्या  सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याचा पुरावा

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 अर्ज प्रक्रिया

  1. MKBY 2023 अंतर्गत अर्ज करायचा  असलेल्या पालकांना  महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्जदाराला माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  3. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपुर्वक भरा.सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म आपल्या जवळच्या महिला आणि बाल विकास कार्यालयात सबमिट करा.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023: अर्ज डाउनलोड

अशा प्रकारे तुमचा माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पूर्ण होईल.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला आता कमेंट मध्ये जरूर कळवा . तसेच आपल्या मित्रांना हि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद .

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

अधिक वाचा :

Maharashtra Kishori Shakti Yojana 2022: महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा
पीएम किसान सम्मान निधि योजना 2023 मराठी | PM Kisan Samman Nidhi Yojana 2023

प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2023 मराठी | Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2023
प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण 2023 मराठी | Pradhan Mantri Gramin Awas Yojana 2023
PM Ujjwala Yojana 2.0 Online Registration 2023: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 मराठी (PMUY) मोफत गॅस कनेक्शन ऑनलाइन अर्ज सुरू

FAQ Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील लिंग निवड थांबवणे हा आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली?

महाराष्ट्र राज्य शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली होती.