Maharastra Vihir Yojana 2022 | ४ लाख रु मिळणार अनुदान

Maharastra Vihir Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि सुखावणारा GR राज्य सरकारने जाहीर केला आहे. तुम्हाला लखपती बनवण्याचाच सरकारने जणू निर्णय घेतला आहे. आता मागेल त्याला विहीर सिंचन मिळणार आहे. महाराष्ट्रातील  प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहिरीची कामे आता लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. या संबंधाचा शाषन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आला आहे. केवळ विहीर दिली म्हणजे झाले असेही नाही, विहीर असेल आणि त्या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पंपच नसेल तर शेतकरी लखपती कसे होणार ? विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवांना पंप म्हणजेच सोलर पंप देले जाणार असा देखील उल्लेख या GR मध्ये करण्यात आला आहे. शेतकरी लखपती व्हावा यासाठी त्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन व इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Maharastra Vihir Yojana 2022 काय आहे

अस्तित्वातील विहिरीपासून ५०० मी असलेल्या नियमातही बदल करण्यात आलेला असून आता हे अंतर १५० मी करण्यात आले आहे.परंतु हा नियम ठराविक बाबींसाठीच लागू असणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला सिंचन विहीर मिळणार आहे. विहिरीसंदर्भातील नियम, अटी, निधी लाभार्थी पात्रता यासंदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Maharastra Vihir Yojana 2022 अनुदान किती मिळेल

पूर्वी सिंचन विहिरीसाठी ३ लाखाचे अनुदान मिळत होते परंतु ते आता वाढून ४ लाख करण्यात आले आहे. म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहिरीसाठी आला ४ लाख रु अनुदान मिळणार आहे. यासाठीचा GR नुकताच राज्य सरकारने जाहीर केलेला आहे.

Maharastra Vihir Yojana 2022 प्राधान्यता कोणाला आहे

सिंचन विहिरीसाठी कोणती पात्रता GR मध्ये दिली गेलेली आहे ते आपण जाणून घेऊ. खालील प्राधान्य क्रमानुसार सिंचन विहिरीची सुविधा दिली जाणार आहे.

  1. अनुसूचित जमाती 
  2. अनुसूचित जाती
  3. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  4. स्त्री– कर्ता असलेली कुटुंबे
  5. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
  6. जमीन सुधारणांचे लाभार्थी
  7. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  8. भटक्या जमाती
  9. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
  10. अनुसूचित जमाती व इतर वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम
  11. 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
  12. सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
  13. अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)

Maharastra Vihir Yojana 2022 लाभार्थी पात्रता 

  •  लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र भुजल ( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील असलेल्या विहीर स्त्रोताच्या 500 मीटर जवळ  नवीन विहिर घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.त्यामुळे अस्तित्वातील पाणी स्त्रोताच्या 500 मीटर आवरणार सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
  • यापूर्वी कोणत्याही विहीरीची नोंद लाभार्थ्याच्या 7/12 वर नसावी  
  • लाभधारकाने एकूण क्षेत्राचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. (Online)
  • संयुक्त विहीर एकापेक्षा जास्त लाभधारकांना घेण्यासाठी  त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असायला हवे.
  • जॉब कार्डधारक लाभार्थ्यांनाच विहिरीचा फायदा घेता येणार आहे.
  • दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराच्या  अटीसाठी  पुढील  काही अपवाद आहेत.
  • दोन सिंचन विहिरीमधील किमान अंतर  150 मीटरची अट Run off Zone आणि अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यासाठी लागू करण्यात येणार नाही.
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर घेतांना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू नसणार.

Maharastra Vihir Yojana 2022 अर्ज व कार्यपद्धती

इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतीच्या अर्ज पेटीत हा नमुना टाकायचा आहे.ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यानंतर लाभार्थ्यांना हा अर्ज शक्यतो ऑनलाइनच द्यावा लागेल.

Maharastra Vihir Yojana 2022 आवश्यक कागदपत्रे

  1. ऑनलाइन 7/12 चा उतारा.
  2. 8 अ चा ऑनलाइन  उतारा.
  3. जाॅब कार्डची प्रत
  4. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा
  5. सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्याम्ध्ये करारपत्र

विहीर कोठे खोदावी

  1. दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से.मी. वर किमान ५ मोटार खोलीपर्यंत झिजलेला खडक आढळतो तेथे
  2. नदी व नाल्या जवळील गाळाच्या प्रदेशात.
  3. जमिनीच्या सलग भागात जेथे किमान ३० से.मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मोटार खोलीपर्यंत झिजलेला खडक आढळतो तेथे
  4. नाल्यांच्या तीरावर जेथे उंचवटे आहे तेथे,परंतू सदर उंचावर रोपण किंवा चिकन माती नसावी.
  5. घनदाट व गर्द पानांच्या प्रदेशात 
  6. नदी व नाल्यांचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र भरतांना देखील वाळू ,रेती व गारगोट्या भर दिसून येईल.
  7. नदीचे किंवा नाल्याचे गोलाकार दळणाच्या  आतील भूभाग.
  8. अचानक दमात वाटणार्या अथवा असणाऱ्या जागेत. 

विहीर कोठे खोदू नये

  1. भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत
  2. डोंगराचा कडा व आसपासचा परिसर ५५० मीटरचे अंतरात.
  3. मातीची थर ३०से.मी.पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात 
  4. झिजलेला खडक खोली ५ मी पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

तुम्हाला जर ही Maharastra Vihir Yojana 2022 माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. तुम्हला जे काही सरकारी योजनेविषयी माहिती हवी असेल ते तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच त्या विषयावर ब्लॉग लिहू. धन्यवाद.

अधिक वाचा : PM Kisan 13th Installment यादी जाहीर घरबसल्या तुम्ही पाहू शकता