Jilha Parishad Yojana 2022 Maharashtra | 75% अनुदान मिळणार लवकरच

Jilha Parishad Yojana 2022: नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद योजना 2022 सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करता येतो.अर्ज अगदी मोबाईल वरून देखील करता येतो.जिल्हा परिषद दरवर्षी अनेक योजनांसाठी अर्ज मागवत असते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद या योजना काढत असते.प्रत्येक योजना ही त्या त्या जिल्ह्यासाठी मर्यादित असते.या योजनांसाठी जिल्हा परिषद ऑनलाईन किंवा ऑफलाईन देशील अर्ज मागू शकते.त्या विषयी संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

योजनेचे नावजिल्हा परिषद योजना 2022
वर्ष2022
राज्यमहाराष्ट्र
कोणामार्फत सुरूजिल्हा परिषदा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन किंवा ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटपुणे जिल्हा परिषद

Jilha Parishad Yojana 2022 अंतर्गत येणाऱ्या योजना 

खालील अशा अनेक योजनंचा समावेश जिल्हा परिषद अंतर्गत योजनामध्ये येतो.

  • तुषार सिंचनाचा संच.
  • 5 HP पाण्याची विद्यत मोटार.
  • झेरॉक्स मशीन.
  • मिरची कांडप यंत्र.
  • पिठ गिरणी.
  • अपंग व्यक्तीसाठी लहान पिठाची गिरणी.
  • अपंगसाठी  सायकल.
  • अपंगाना व्यक्तींना  झेरॉक्स मशीन.
  • शेळी पालन गट वाटप योजना.
  • गाय , म्हैस अनुदान योजना.
  • स्प्रिंकलरची योजना.

Jilha Parishad Yojana 2022 आवश्यक कागदपत्रे 

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.

  1. जातीचे प्रमाणपत्र
  2. कुटुंबातील कोणी नोकर सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र
  3.  उत्पन्न दाखला
  4.  आधार कार्ड
  5. बँक पासबुकची झेरोक्स
  6. दारिद्र रेषेखालील दाखला
  7. रहिवासी दाखला
  8. सातबारा उतारा (७/१२)
  9.  या अगोदर  योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

अर्ज कसा करायचा 

इच्छुक उमेदवार खालील पद्धतीनुसार अर्ज करू शकता.

  1. सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला विविध विभागांसाठी विविध योजना दिसेल.
  3. तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेच्या संबंधित विभाग निवडा.
  4. विभाग निवडल्यानंतर, या ठिकाणी तुम्हाला विविध योजनांची यादी दिसेल, तुम्हाला हवी असलेली योजना निवडा आणि त्यासाठीच्या अर्जातील संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
  5. अर्जामध्ये भरल्यानंतर, अर्ज सबमिट या बटनावर क्लिक करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही या अर्जाची प्रिंट पंचायत समितीकडे’जमा करावे.

वरील पद्धतीनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

Jilha Parishad Yojana 2022 form

पुणे जिल्हा परिषद अर्ज

मित्रांनो अशा पध्दतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.तुम्हाला जर ही Jilha Parishad Yojana 2022 माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. तुम्हाला जे काही सरकारी योजनेविषयी माहिती हवी असेल ते तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच त्या विषयावर ब्लॉग लिहू. धन्यवाद.

अधिक वाचा : Free Silai Machine Yojana 2022 | फॉर्म भरल्यास तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळेल?

FAQs on Jilha Parishad Yojana 2022

जिल्हा परिषद मार्फत किती योजना चालवल्या जातात?

20 पेक्षा जास्त

जिल्हा परिषदा किती जिल्ह्यांच्या योजना राबवत आहे?

34

जिल्हा परिषदा योजनांसाठी किती अनुदान दिले जात आहे?

75 टक्के अनुदान