Indian Oil IOCL Apprentice Recruitment 2022 : शिकाऊ पदासाठी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. IOCL Apprentice Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल? तर ही संधी सोडू नका. दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (Indian Oil Corporation) अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच, 14 डिसेंबर 2022 बुधवारपासून सुरू झाले आहेत. Indian Oil
शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरावा
Indian Oil जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरावा. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे, दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. IOCL च्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 1760 पदांची भरती केली जाईल. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांचा समावेश आहे. निवडीनंतर, उमेदवारांची दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी देशभरातील विविध राज्यांमध्ये नियुक्ती केली जाईल.
कोण अर्ज करू शकतं ?
या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदांनुसार वेगळी आहे. दहावी पास उमेदवार ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करू शकतात. किमान 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण उमेदवार तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करू शकतात आणि किमान 50 टक्के गुणांसह बीए, बीएससी, बीकॉम उत्तीर्ण उमेदवार पदवीधर उमेदवार पदासाठी अर्ज करू शकतात. तिनही प्रकरणांमध्ये, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा देखील असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाला गुणांमध्ये सूट मिळेल. या पदांसाठी 21 ते 24 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवड कशी होईल?
Indian Oil कॉर्पोरेशनच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न येतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. त्यापैकी एक बरोबर असेल. निवड झाल्यानंतर या उमेदवारांची सेवा एक वर्षासाठी असेल. फक्त ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर) 15 महिने आणि ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) 14 महिने असेल.
ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा
निष्कर्ष
जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या लेखाशी जोडलेले राहा जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी पासून तुम्ही वंचित राहता कामा नये. सरकारी योजना किंवा इतर कोणत्याही संबंधित योजनाचे अपडेट सर्वात पहिले आम्ही आणतो.