How To Check Balance: लाडकी बहिण योजना चा बॅलन्स चेक करा एका मिस कॉलवर

How To Check Balance: महिलांना पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही टप्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यांना हे पैसे मिळाले आहेत, परंतु काही महिला भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 3000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे. या योजनेचा लाभ सर्व महिलांना देण्यात आलेला आहे, परंतु काही महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत तरी त्यांना याबाबत माहिती नाही. चौकशी केल्यानंतर असे समजले आहे की बऱ्याच महिला भगिनींची खाती डीऍक्टिव्हेट झालेली आहेत किंवा बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या खात्यातील माहिती सहजपणे उपलब्ध होत नाही. यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागेल. तिथेच तुम्हाला खात्यातील पैसे किती आहेत याची माहिती मिळेल आणि पैसे काढायचे असल्यास काय करावे लागेल, याबद्दलची माहिती महत्त्वाची आहे.

नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा पैसा पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांचे बँक खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये आहे, त्यांनी त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे, याबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

How To Check Balance | लाडकी बहीण योजना

📝 योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
🚀 सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🗺️ राज्यमहाराष्ट्र
📅 वर्ष२०२४
👩‍🦱 लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
🎯 उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
💰 लाभआर्थिक मदत प्रति महिना
💵 आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
🖥️ अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
🗓️ योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३० सप्टेंबर २०२४
🌐 लाडली बहीण योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
📲 महाराष्ट्र लाडकी बहीण पोर्टलNariDoot App

इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही ते चेक कसे करायचे | IPPB Ladki Bahin Yojana Installment

इंडियन पोस्ट पेमेंट बँक SMS बँकिंग सुविधा पुरवते. ग्राहकांनी त्यांच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यातील बॅलन्स चेक करायचा असल्यास, त्यांनी कॅपिटल अक्षरांमध्ये “BAL” टाईप करून 7738062873 या नंबरवर SMS पाठवावा. यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील सर्व तपशील मिळतील आणि तुम्हाला खात्यात किती पैसे आहेत हे दिसेल.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले हे मिस कॉलवर चेक करा | Miss Call वर बँक बॅलन्स चेक करा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या भारतीय पोस्ट बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही एका मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल देऊन तुमच्या बँक बॅलन्सची माहिती मिळवू शकता. जर तुमच्या खात्यात आतापर्यंत पैसे आले नसतील आणि तुमचा मोबाईल नंबर खात्याशी लिंक केलेला असेल, तर तुम्ही 8424046556 या नंबरवर एक मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स चेक करू शकता. तुमच्या मिस कॉलच्या उत्तरात तुम्हाला एक एसएमएस देखील येईल, ज्यात तुम्ही बॅलन्स पाहू शकता.

पाचवा आणि चौथा हप्ता दोन-तीन दिवसांमध्ये जमा होणार | Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment Update

महाराष्ट्र सरकारने 5 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु ज्या महिलांना या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाही, अशा महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात उर्वरित महिलांच्या खात्यात या योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच जमा होणार आहेत, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

अधिक वाचा: Ladki Bahin 5th Installment Update: लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी, 48 तासात मिळवा ₹7500 – फक्त हे काम करा आता

Leave a comment