Forest Guard Recruitment 2022: मित्रांनो तुमच्यासाठी आज मी मोठी खुशखबर आणली आहे. येणाऱ्या २ महिन्यांत वनरक्षक भरती २०२२ सुरू होणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये आज देणार आहोत. कृपया तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
जिल्ह्यानुसार वनरक्षक भरती संभाव्य जागा
जिल्हा | जागा |
नाशिक | 76 |
औरंगाबाद | 122 |
ठाणे | 363 |
कोल्हापूर | 200 |
यवतमाळ | 86 |
चंद्रपूर | 88 |
गडचिरोली | 222 |
अमरावती | 260 |
पुणे | 81 |
पात्रता
मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी पात्र उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनख़बरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा
मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी अर्ज करणार आहे. तेव्हा तुमचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ ते २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम – महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत. |
उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. |
प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. |
Forest Guard Recruitment 2022 अभ्यासक्रम
बौद्धिक चाचणी | 30 गुण |
सामान्य ज्ञान (पर्यावरण विशेष) | 30 गुण |
शारीरिक परीक्षा | 80 गुण |
मराठी | 30 गुण |
इंग्लिश | 30 गुण |
या गोष्टी तुम्हांला माहित असणे आवश्यक आहे
लेखी परीक्षा ही ९० मिनिटाची राहणार आहे . |
उमेदवारांना परीक्षा दालनात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास त्यांनी वापरण्यास सक्त मनाई आहे. |
लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पध्दतीने संगणकावर घेण्यात येणार आहे . |
परीक्षेवेळी इकडे-तिकडे बघणे, डोकावणे, तोतयागिरी करतांना आढळल्यास उमेदवारास परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात येईल. |
- परीक्षा ही ऑनलाईन मार्गाने होणार आहे.
- मित्रांनो या वनरक्षक भरतीसाठी 0.25 ही नकारात्मक गुणपद्धती राहणार आहे.
- १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल. लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (१० वी) पातळीची राहील.