रोजगार हमी योजना २०२२ सविस्तर माहिती आपल्या मराठीत

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या सरकारी योजना या तुमच्या हक्काच्या एकमात्र वेबसाइटवर. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक प्रकारच्या सरकारी योजना या सरकार राबवत असतो. त्या सरकारी योजनांचा मूळ उद्देश हा आपल्या राज्यातील सर्वसामान्य गरीब जनतेला त्याचा लाभ मिळावा हा असतो. त्यासाठीच महाराष्ट्र शासनांनी रोजगार हमी योजनेची सुरुवात केली आहे. आज आपण सविस्तरपणे या योजनेविषयी माहिती बघणार आहोत. कृपया तुम्ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

रोजगार हमी योजना कोणी सुरु केली

मित्रांनो १९७२ मध्ये आपल्या महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ हा पडला होता. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तेव्हाचे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी हि योजना सुरु केली. या योजनेची मुख्य संकल्पना अशी आहे कि, वर्षातील काही ठराविक दिवस हे कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या कामाचा मोबदला म्हणून कामगारांना रोख रक्कम तसेच अन्नधान्य हे प्रदान केले जाते.

रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली

रोजगार हमी योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने संपूर्ण भारतभर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ज्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या नावाने ओळखले जाते. २ ऑक्टोबर २००९ पासून या योजनेचे नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजेच (मनरेगा) असे करण्यात आले. ‘मागेल त्याला काम या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय निधीतून १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. तसेच, २६५ दिवसाची हमी राज्य शासनाकडून दिली जाते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विस्तार हा पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.

मित्रांनो आजची रोजगार हमी योजना २०२२ ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते कृपया आम्हांला कमेंट मध्ये सांगा. अशाच महत्वपूर्ण सरकारी योजनांसाठी आणि जॉबसाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच आमच्या वेबसाईटला तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता. धन्यवाद.

अधिक वाचा : Surakshit Matritva Aashwasan Yojana |सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना 2022

FAQ रोजगार हमी योजना २०२२

भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?

मित्रांनो आपले पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली आणि अन्न आणि धान्य टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन आयोगाचे नेतृत्व त्यांनी केले होते.

11 व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते?

११ व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग हे होते.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

राष्ट्रीय उत्पन्नात 4.5% वार्षिक वृद्धी दराचे उद्दिष्ट हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आले होते.