नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! मुलींना ओझं समजलं जात असल्यामुळे शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जात. त्यामुळे आता सरकारने ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचे पूर्ण शुल्क माफ केले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुलींचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ होणार आहे आणि हा खर्च महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थांना भरून देणार आहे.
मुलींची उच्च शिक्षणाकडे अधिक प्रवृत्ती व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुलींना शिक्षणामध्ये ५०% सवलत मिळत होती. आता ही सवलत वाढवून ती १००% करण्यात आली आहे.
👉 मतदान यादी 2024 झाली जाहीर इथे क्लिक करून बघा 👈
विद्यापीठांनी विविध उच्च शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त मुलींना प्रवेश देण्याचा प्रयत्न करावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी सुचवले आहे. तसेच, कुलगुरूंनी वेळेवर निकाल लावण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना याचा फायदा होणार असून विद्यापीठांमध्ये त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या बैठकीला राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. त्यांनीही वेळेवर निकाल लावण्याच्या सूचना दिल्या आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये किंवा त्यांना नोकरीची संधी हुकू नये यासाठी वेळेवर निकाल लागणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. उशिरा निकाल लागल्यास त्यासाठी कुलगुरूंना जबाबदार धरले जावे, असे त्यांनी यापूर्वी म्हणाले होते.
मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती ‘फी माफी’ची ‘मेगा’ घोषणा आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.
अधिक वाचा: महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजना आता घरीच मिळणार शासनाचे लाभ