नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग sarkariyojanamh.in वर. या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सरकारी योजनेविषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच प्रमाण इतकं वाढलं आहे कि, आज प्रत्येक जण काहीना काही आपापल्या परीने एक सुजाण नागरिक या दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लोकांना मदत करण्याचा प्रयन्त करत आहे.
याच शोधात आम्ही हि निघालो होतो. बराच काळ संशोधन केल्यावर लक्षात आलं कि, आपल्या महाराष्ट्रात मराठी मायबोली भाषेत सरकारी योजना या विषयावर हवी तितकि माहिती उपलब्ध नाही आहे. आणि मराठी माणसाच्या अगदी जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे शेती. शेतीविषयक जे काही GR किंवा नवीन केंद्र सरकारच्या, राज्यच्या जे काही सरकारी योजना आहेत त्या सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा हा एक आमचा छोटाशा प्रयन्त.
मित्रांनो या ब्लॉग चा मुख्य उद्देश हा सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत सरकारी योजनेची म्हणजे त्याच्या स्वतःच्या हक्काची माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणे हा होय. जस कि तुम्हाला माहित आहे, आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. आणि आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण अश्या महाराष्ट्रात राहतो. महान संत तुकाराम महाराज म्हणतात कि ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ , या उक्तीप्रमाणे आपण एकमेकांना सहकार्य करून निश्चितच पुढे जाऊ. मित्रांनो यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे. आशा आहे कि तुम्हाला आमची हि संकल्पना निश्चितच आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रपरिवाराला आमचा ब्लॉग शेअर करु शकता. धन्यवाद ….