Forest Guard Recruitment 2022: मित्रांनो तुमच्यासाठी आज मी मोठी खुशखबर आणली आहे. येणाऱ्या २ महिन्यांत वनरक्षक भरती २०२२ सुरू होणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये आज देणार आहोत. कृपया तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
जिल्ह्यानुसार वनरक्षक भरती संभाव्य जागा
| जिल्हा | जागा |
| नाशिक | 76 |
| औरंगाबाद | 122 |
| ठाणे | 363 |
| कोल्हापूर | 200 |
| यवतमाळ | 86 |
| चंद्रपूर | 88 |
| गडचिरोली | 222 |
| अमरावती | 260 |
| पुणे | 81 |
पात्रता
मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी पात्र उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
| माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
| अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
| नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनख़बरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा
मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी अर्ज करणार आहे. तेव्हा तुमचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ ते २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
| उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम – महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत. |
| उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. |
| प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. |
Forest Guard Recruitment 2022 अभ्यासक्रम
| बौद्धिक चाचणी | 30 गुण |
| सामान्य ज्ञान (पर्यावरण विशेष) | 30 गुण |
| शारीरिक परीक्षा | 80 गुण |
| मराठी | 30 गुण |
| इंग्लिश | 30 गुण |
या गोष्टी तुम्हांला माहित असणे आवश्यक आहे
| लेखी परीक्षा ही ९० मिनिटाची राहणार आहे . |
| उमेदवारांना परीक्षा दालनात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास त्यांनी वापरण्यास सक्त मनाई आहे. |
| लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पध्दतीने संगणकावर घेण्यात येणार आहे . |
| परीक्षेवेळी इकडे-तिकडे बघणे, डोकावणे, तोतयागिरी करतांना आढळल्यास उमेदवारास परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात येईल. |
- परीक्षा ही ऑनलाईन मार्गाने होणार आहे.
- मित्रांनो या वनरक्षक भरतीसाठी 0.25 ही नकारात्मक गुणपद्धती राहणार आहे.
- १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल. लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (१० वी) पातळीची राहील.