Gatai Kamgar Stall Yojana 2025: राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू करण्यात आली आहे – गटई कामगार योजना 2025. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना १००% सरकारी अनुदानावर पत्र्याचे स्टॉल मोफत दिले जाणार आहेत.
सध्या या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने इच्छुक पात्र लाभार्थींनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय?
या योजनेचा मुख्य उद्देश चर्मकार गटई कामगारांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी व्यवसायिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी गटई स्टॉल योजना 2025 राबवली जाते.
दरवर्षी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत ठराविक लक्ष्यांसह राबवली जाते. यंदाही ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली असून पात्र अर्जदारांसाठी ही एक मोठी संधी आहे.
गटई कामगार योजना अर्ज प्रक्रिया
- ही योजना फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करून मिळवता येते.
- अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात मोफत मिळतो.
- तसेच गटई स्टॉल योजना अर्ज PDF देखील उपलब्ध असून तो प्रिंट करून भरून सादर करता येतो.
- भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जमा करायचे आहेत.
गटई स्टॉल योजना साठी आवश्यक कागदपत्रे
- अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा जात प्रमाणपत्र (तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याचा)
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र
- राशन कार्ड झेरॉक्स
- ज्या जागी स्टॉल टाकायचा आहे त्या ठिकाणचा भाडे करार / भाडेचीठ्ठी
- गटई काम करणारा फोटो किंवा पुरावा
पात्रता (Eligibility) – गटई स्टॉल योजना 2025
- अर्जदार SC प्रवर्गातील चर्मकार समाजातील असावा.
- महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक.
- वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
- संबंधित व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असावा.
- ग्रामीण भागात उत्पन्न ₹98,000 पेक्षा कमी, शहरी भागात ₹1.20 लाख पेक्षा कमी असावे.
किती अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत १००% अनुदानावर पत्र्याचा स्टॉल मिळतो. अर्जदाराला यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. शासनाच्या निधीतून चर्मकार गटई कामगारांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत दुकान (पत्र्याचा स्टॉल) दिला जातो.
अर्ज कसा करावा?
- समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्जाचा नमुना घ्या किंवा या लेखातून PDF डाउनलोड करा.
- सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
- आपल्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करा.
निष्कर्ष
गटई कामगार योजना 2025 ही अनुसूचित जातीतील चर्मकार बांधवांसाठी स्वावलंबनाचा मार्ग खुला करणारी योजना आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. लवकरात लवकर अर्ज करा आणि मिळवा १००% अनुदानावर पत्र्याचा स्टॉल!
Lek Ladki Yojana Maharashtra | लेक लाडकी योजना 2025 तुमची मुलगी पात्र आहे का? लगेच ऑनलाईन अर्ज करा!