Lek Ladki Yojana Maharashtra | लेक लाडकी योजना 2025 तुमची मुलगी पात्र आहे का? लगेच ऑनलाईन अर्ज करा!

Lek Ladki Yojana Maharashtra: मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि बालविवाह टाळणे यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची पाऊल उचलले आहे. लेक लाडकी योजना 2025 ही योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून सुरू करण्यात आली आहे. जर आपल्या घरात 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुलीच्या जन्मानंतर लगेचच सरकारकडून ₹5,000 ची पहिली आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो.

लेक लाडकी योजना म्हणजे काय?

लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यातील गरीब व गरजू कुटुंबातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एकूण ₹1,01,000 ची आर्थिक मदत पाच टप्प्यांमध्ये दिली जाते.

ही मदत थेट आई-वडिलांच्या बँक खात्यावर जमा केली जाते, त्यामुळे कुठल्याही दलालांपासून बचाव होतो आणि लाभ थेट मिळतो.

लेक लाडकी योजना

योजनेचे नावलेक लाडकी योजना
🚩 लाभमुलींना मिळणार ₹1 लाख रुपयांची मदत
🚩 कोणत्या नेत्याने सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🚩 योजनेची सुरूवात1 ऑगस्ट 2017
🚩 लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील महिलावर्ग
🚩 उद्दिष्टमुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन देणे
🚩 एकूण आर्थिक मदत₹1,00,000 (पाच टप्प्यांमध्ये)
🚩 अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाईन
🚩 अधिकृत संकेतस्थळlly.mhicds.com

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे
  • मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे
  • बालविवाह थांबवणे
  • मुली आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणे

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे:

  • अर्जदार महाराष्ट्रचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • पीळा किंवा नारंगी रेशन कार्डधारक असावा.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असावे.
  • मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.
  • दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्याच्या कर्जासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • अंतिम टप्प्यासाठी मुलीने किमान 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्राचा रहिवासी प्रमाणपत्र
  • पालकांचा आधार कार्ड
  • पीळा/नारंगी रेशन कार्ड
  • मुलीचा जन्म प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (ज्याठप्प्यावर लागू होईल)
  • बँक पासबुक
  • स्वयंघोषणापत्र
  • बोनाफाईड सर्टिफिकेट (शाळेचा)
  • मतदार ओळखपत्र (18 वर्षे पूर्ण झाल्यावर)

लेक लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचे टप्पे

टप्पापरिस्थितीआर्थिक मदत
1मुलीच्या जन्मानंतर₹5,000
21लीमध्ये प्रवेश घेतल्यावर₹6,000
36वीमध्ये प्रवेश घेतल्यावर₹7,000
411वीमध्ये प्रवेश घेतल्यावर₹8,000
518 वर्ष पूर्ण केल्यानंतर₹75,000

एकूण ₹1,01,000 ची मदत मुलीच्या शिक्षण व भविष्यासाठी दिली जाते.

Lek Ladki Yojana 2025 Online Apply कसा करावा?

  1. सर्वप्रथम lly.mhicds.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा.
  3. फॉर्मची प्रिंट काढा आणि सर्व माहिती अचूक भरावी.
  4. आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  5. फॉर्म आपल्या ग्रामपंचायत, सीएससी केंद्र किंवा अंगणवाडी कार्यालयात जमा करा.
  6. अधिकृत कर्मचारी तुमचा फॉर्म ऑनलाइन भरतील.
  7. तुम्हाला एक पावती दिली जाईल, ही सुरक्षित ठेवा.

Lek Ladki Yojana Form Maharashtra 2025 PDF Download

जर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकत नसाल, तर तुम्ही ऑफलाइन फॉर्म भरून देखील अर्ज करू शकता. PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा किंवा तुमच्या नजिकच्या अंगणवाडी केंद्रात फॉर्म मिळवू शकता.

महत्त्वाचे मुद्दे

  • लेक लाडकी योजनेत अर्ज करताना सर्व माहिती अचूक द्या.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • योजनेची पावती सुरक्षित ठेवा, भविष्यात उपयुक्त ठरेल.
  • योजना संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक अधिकारी/ग्रामसेवक/आंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करा.

लेक लाडकी योजना 2025 हे सरकारचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी घेतले गेले आहे. आपल्या मुलीला शिक्षणात आणि स्वावलंबी होण्यासाठी चालना देण्यासाठी या योजनेचा लाभ नक्की घ्या!

Free Sauchalay Yojana Registration 2025: फ्री शौचालय योजना सरकार देतेय मोफत शौचालय! लगेच असा करा अर्ज, संधी गमावू नका!