Ladki Bahin 5th Installment Update: महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत पुरवण्याच्या उद्देशाने लागू केली आहे. या योजनेतून महाराष्ट्र सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देत आहे, ज्यामुळे त्या महिलांना आपल्या परिवाराचा सांभाळ करता येईल आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये.
सध्या महाराष्ट्र सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये काही महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे 7500 रुपये जमा झाले आहेत. परंतु अजूनही अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, चला पाहूया लाडकी बहीण योजनेच्या 5व्या हप्त्याबाबत संपूर्ण माहिती.
Ladki Bahin 5th Installment Update
📝 योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
👤 सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
📍 राज्य | महाराष्ट्र |
📅 वर्ष | २०२४ |
👩🦱 लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
🎯 उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
💵 लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
💰 आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
📝 अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
🗓️ योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
🗓️ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३० सप्टेंबर २०२४ |
🌐 लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
📱 महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मोफत 3 गॅस सिलिंडरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. सध्या लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळायला सुरुवात झाली आहे, परंतु अजून काही महिलांना मोफत तीन गॅस सिलिंडरचे पैसे मिळालेले नाहीत.
महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, 2 ऑक्टोबरपासून महिलांच्या खात्यात मोफत गॅस सिलिंडरचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.
बँक खाते आधार लिंक केल्यानंतर किती दिवसात पैसे मिळणार?
काही महिलांचे अर्ज मंजूर झाले होते, परंतु त्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता. त्यांचे बँक खाते आधार लिंक न केल्यामुळे असा प्रकार घडला होता. आता आधार लिंक केल्यानंतर महिलांना प्रश्न पडला आहे की, पैसे किती दिवसांत जमा होतील?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आधार लिंक केल्यानंतर 48 तासांत महिलांच्या खात्यात सर्व हप्ते जमा होतील. म्हणजेच पाच हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात येतील.
पुढील 24 तासांत ₹7500 जमा होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये किंवा पाच हप्त्यांचे 7500 रुपये जमा होतील. त्यामुळे महिलांनी चिंता करण्याचे कारण नाही.
महिलांच्या खात्यात पुन्हा ₹7500 जमा होणार
अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना हप्ता मिळाला नसल्यामुळे त्या चिंताग्रस्त आहेत. परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही. 10 ऑक्टोबरनंतरही सरकार योजनेचे पैसे जमा करत राहणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही, त्या काही दिवसांत आपल्या खात्यात 7500 रुपये जमा होतील.